Ajit Pawar | “पलटण वाढवू नका, देवाची कृपा म्हणून…”; कुटुंबनियोजनाबाबत अजित पवारांचा महिलांना सल्ला

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ajit Pawar | पुणे : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नेहमीच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओखळले जातात. रविवारी एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी कुटुंब नियोजनाचा सल्ला दिला आहे.

“महिलांना जाता जाता एकच सांगतो आवडो किंवा न आवडो. आपली सूनबाई किंवा मुलीला दोन अपत्यांवरच थांबायला सांगा. आणखी अजिबात काही वाढवा वाढवी नको. दोन्ही मुली झाल्या तरी त्या सोन्यासारख्या आहेत”, असा सल्ला अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिला आहे. यावेळी बोलताना त्यांनी शरद पवार यांचं उदाहरण देखील दिलंय.

ते म्हणाले, “शरद पवार एका अपत्यावर थांबले की नाहीत. सुप्रिया शरद पवार यांचे नाव काढत आहे की नाही. पोरगंच पाहीजे, वंशाचा दिवाचा पाहिजे. कशाचा वंशाचा दिवा. मुलगीदेखील कर्तबगार असते हे अनुभवतोय. त्यामुळे मर्यादित कुटुंब ठेवा.”

“छोट्या कुटुंबामुळे सगळ्या सुविधा तुम्हाला मिळतील. नाहीतर उगाच पलटण चालू आहे. देवाची कृपा म्हणून. देव वरुन देतोय का? आम्हाला कळत नाहीये का कोणाची कृपा आहे,” असं म्हणताच सभागृहात एकच हश्शा पिकला.

महत्वाच्या बातम्या :