Share

Skin Care Tips | त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी चेहऱ्यावर ‘या’ पद्धतीने लावा कांद्याचा रस

🕒 1 min read Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले रसायनयुक्त उत्पादन वापरतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या कांद्याचा उपयोग करू शकतात. कांद्याचा रस आरोग्यासाठी खूप … Read more

Published On: 

🕒 1 min read

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेले रसायनयुक्त उत्पादन वापरतात. मात्र, ही उत्पादन त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या कांद्याचा उपयोग करू शकतात. कांद्याचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर त्वचेवरील समस्या दूर करण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त ठरू शकतो. कांद्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार होण्यासोबतच त्वचेवरील अनेक समस्या सहज दूर होतात. त्वचेवरील चमक वाढवण्यासाठी आणि तिची काळजी घेण्यासाठी पुढील पद्धतीने कांद्याचा रस वापरावा.

त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी पुढील पद्धतीने कांद्याचा रस वापरा

कांद्याचा रस आणि मध

कांद्याचा रस आणि मध त्वचेला लावल्याने त्वचा चमकदार होण्यासोबतच पिंपल्सची समस्या सहज दूर होऊ शकते. यासाठी तुम्हाला दोन चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा मध मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. नियमित या मिश्रणाचा वापर केल्याने तुमच्या त्वचेवरील पिंपल्सची समस्या कमी होऊ शकते.

कांद्याचा रस आणि खोबरेल तेल

कांद्याच्या रसात खोबरेल तेल मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील अनेक समस्या दूर होऊ शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा कांद्याच्या रसामध्ये एक चमचा खोबरेल तेल मिसळून घ्यावे लागेल. नियमित हे मिश्रण त्वचेवर लावल्याने त्वचेवरील तेलकटपणा कमी होण्यास मदत होते. तेलकट त्वचेसाठी हे मिश्रण खूप फायदेशीर ठरू शकते.

कांद्याचा रस आणि दही

तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आणि वृद्धत्वाची लक्षणे दिसत असतील, तर तुमच्यासाठी कांद्याचा रस आणि दही हे मिश्रण खूप फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला एक चमचा कांद्याच्या रसामध्ये दोन चमचे दही मिसळून मिश्रण तयार करून घ्यावे लागेल. हे मिश्रण व्यवस्थित तयार झाल्यानंतर तुम्हाला पाच मिनिटात चेहऱ्यावर लावून ठेवावे लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा सामान्य पाण्याने धुवावा लागेल. या मिश्रणाच्या नियमित वापराने डेड स्किन साफ होऊन चेहऱ्यावरील चमक वाढू शकते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही