Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये (Maharashtra) थंडी (Cold) चा कडाका मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. किमान तापमानात (Temprature) पुन्हा घट झाल्याने गारठा वाढला आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ही थंडी कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर, राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली येऊन पोहोचला आहे.
मुंबईमध्ये देखील दिवसेंदिवस थंडीचा पारा वाढत चालला आहे. मुंबईचे तापमान 13 अंश सेल्सिअसपर्यंत येऊन पोहोचलं आहे. कमाल तापमानात देखील घसरण झाल्यामुळे मुंबईत दिवसभर गारठा जाणवतं आहे. त्यामुळे मुंबईकरांना यावर्षी चांगलीच थंडी अनुभवायला मिळत आहे. मुंबईमध्ये आणखी 3 दिवस थंडीचा मुक्काम राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
सध्या देशामध्ये इराण, इराक, अफगाणिस्तानवरून वेस्टर्न डिस्टबर्न्स येत आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्स आल्यानंतर थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. वेस्टर्न डिस्टबर्न्समध्ये त्या ठिकाणी पाऊस पडतो. तर याच कालावधीमध्ये जम्मू-काश्मीर, लेह, लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात थंडी वाढत चालली आहे.
राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात बदल दिसून आला आहे. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी लोक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहे. तर, या वाढत्या थंडीमुळे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या संख्येमध्ये घट दिसून आली आहे. राज्यात पुढील 10 दिवस ही थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या ठिकाणी थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर नाशिक, नागपूर, पुणे या ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता देखील हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वांनी आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन सरकारकडून सातत्याने केले जात आहे.
महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiyya | “त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी…”; किरीट सोमय्यांचं शरद पवारांना ओपन चॅलेंज
- Sanjay Raut | “विरोधकांचं ऐक्य वगैरे अशा शब्दांना महत्व देऊन आतापर्यंत त्याग करत आलो, पण आता…”- संजय राऊत
- Shubhangi Patil | “कुणीही मुद्दामून नॉट रीचेबल होत नाही, वेळ आल्यावर…”; शुभांगी पाटील नेमकं काय म्हणाल्या?
- Narayan Rane | “शिवसेनेवर भुकंण्यासाठी नारायण राणे यांना भाजपचं मंत्रिपद”; शिवसेनेची जहरी टीका
- Nana Patole | नाना पटोलेंनी केले नाशिकमधील उमेदवाराचे नाव जाहीर; म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”