Nana Patole | नाना पटोलेंनी केले नाशिकमधील उमेदवाराचे नाव जाहीर; म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”

Nana Patole | मुंबई :  नाशिक (Nashik) पदवीधर निवडणुकीत (Nashik Graduate Constituency) पहिल्या दिवसांपासून ट्विस्ट पाहायला मिळत असून दोन दिवसांपूर्वी अपक्ष उमेदवार तसेच धुळे येथील भाजपच्या कार्यकर्त्या असलेल्या शुभांगी पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिला.

मात्र आज माघारीच्या दिवशी शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याने गोंधळ उडाला. अशातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघातील मविआ उमेदवार शुभांगी पाटील असल्याचं जाहीर केलं.

ते म्हणाले, “जो काही निर्णय द्यायचा तो हायकमांड देईल. आमचे जे निर्णय झाले आहेत त्याप्रमाणे कार्यवाही सुरू झाली आहे. नागपूरची जागा काँग्रेसला देण्यात आली आहे आणि नाशिकमध्ये आम्ही महाविकासआघाडी म्हणून शुभांगी पाटील आमच्या उमेदवार आहेत.”

“महाराष्ट्रातील पाचही जागी महाविकासआघाडी जिंकेल अशी स्थिती आहे. बेईमानी करून दुसऱ्यांची घरं फोडणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा पदवीधरांच्या, शिक्षकांच्या लक्षात आला आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये लोक भाजपाला त्यांची जागा दाखवतील,” असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.