Aaditya Thackeray | मुंबई : शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं. आजही आदित्य ठाकरेंनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील 400 किलोमीटर सिमेंट-काँक्रिट रस्त्यांच्या कंत्राटावरून पुन्हा शिंदे सरकारला लक्ष्य केले आहे.
“6 हजार कोटी रुपये बजेटमध्ये कसे दाखवणार आहात? हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाना आमच्या काळात मान्य झालेला प्रकल्प होता. तरी, फोटो घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री लावत आहेत. त्यासाठी तुम्ही पैसा कुठून आणणार आहात?” असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
“400 किलोमीटर रस्त्यांचा प्रस्ताव कोणी मांडला आहे. 6 हजार कोटी रुपयांचे काम प्रशासकाने मंजूर करणे कितपत योग्य आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात काम होत असताना कोठेही लोकप्रतिनिधींना विचारण्यात आले नाही. हा प्रत्येक पक्षातील नगरसेवकांचा अपमान आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे.
“400 किलोमीटरच्या कामांना किती वर्ष लागणार आहेत. तीन ते चार वर्षांचे टेंडर एकाच वेळी काढत नाही ना? यामुळे आर्थिक संकट ओढावलं जाणार आहे. एक किलोमीटरचा रस्ता दहा कोटी रुपयांत होणार होता. आता तो 17 कोटी रुपयांत होणार आहे,” असे आदित्य ठाकरेंनी म्हणाले आहेत.
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार श्री. आदित्य जी ठाकरे यांची पत्रकार परिषद । शिवसेना भवन, दादर – LIVE@AUThackeray @ShivSena
[ सोमवार – १६/०१/२०२३ ] https://t.co/tUoWSRuGST
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 16, 2023
“मुंबईत सगळीकडे काँक्रिटीकरण झालं आहे. आधी जिथे मातीची मैदानं होती, तिथेही काँक्रिटीकरण झालं. त्यामुळे हे सगळं झाल्यावर मुंबईचा जोशीमठ झाला, तर याला जबाबदार कोण? जगातील कोणत्याही शहरात 100 टक्के काँक्रिटीकरण झालेलं नाही,” असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Prithviraj Chavan । “सत्यजीत तांबेंचं निलंबन होणार?”; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
- Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी करा ‘या’ ज्यूसचे सेवन
- Nashik Legislative Council Election । नाशिक विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट; ‘डॉ. सुधीर तांबे’ यांनी अर्ज घेतला मागे
- Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेंना निलंबित करा; हायकमांडच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला सूचना
- Pankaja Munde | पंकजा मुंडेंचा भाजपला रामराम?; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याकडूनही खुली ऑफर