Nashik Legislative Council Election । नाशिक विधान परिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट; ‘डॉ. सुधीर तांबे’ यांनी अर्ज घेतला मागे

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nashik Legislative Council Election । नाशिक : नाशिक पदवीधर निवडणुकीत रोज नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. अशातच काँग्रेसचे नेते सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांच्या नावाने डमी उमेदवार असलेल्या डॉ. सुधीर सुरेश तांबे (Sudhir Suresh Tambe) यांनी माघार घेतली आहे.

डॉ. सुधीर सुरेश तांबे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. एकच सारखे नाव असल्याने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पण डॉ सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म असून देखील अर्ज सादर केला नव्हता. डमी उमेदवार असलेले सुधीर तांबे हे मूळचे पनवेल येथील आहे.

त्याचबरोबर अपक्ष उमेदवार अमोल खाडे यांची देखील माघार घेतली आहे. आज (१६ जानेवारी) दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची शेवटची मुदत असल्याने सकाळपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. विशेषतः नाशिक पदवीधरमध्ये कुणात लढत होणार याबाबत अनेक चर्चा झाल्या.

अखेर तीन वाजेपर्यंत शुंभागी पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतलाच नाही. मात्र भाजपचे समर्थक धनराज विसपुते आणि धनंजय जाधव यांनी माघार घेतल्यामुळे नाशिकमध्ये सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील विरुद्ध सुभाष जंगले अशी थेट लढत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या :