Shubhangi Patil | काल पाठिंबा अन् आज गायब, ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल

Shubhangi Patil | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील या अचानक गायब झाल्या आहेत. शुभांगी पाटील या नॉट रिचेबल आहेत, त्यावरुन राज्याच्या राजकारणात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे दोन तास बाकी आहेत.

भाजपचे नेते आणि मंत्री शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजपनेही प्रयत्न सुरू केले आहेत. शुभांगी पाटलांचा अर्ज मागे घेण्यासाठी महाजन हे पोहचले असल्याचे बोलले जात आहे. शुभांगी पाटील या नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शुभांगी पाटील या अर्ज मागे घेणार का? असा सवाल केला जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभांगी पाटील यांना नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरे यांना भेटल्यानंतर शुभांगी पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यानंतर त्या नाशिकमध्ये परतल्या.

नाशिकला गेल्यानंतर शुभांगी पाटील यांचा फोन बंद असल्याने त्यांच्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही त्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. मंत्री गिरीश महाजन हे कालपासून नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत. प्रत्येक उमेदवाराला माघार घेण्यासाठी महाजन यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

दरम्यान, काही उमेदवारांनी माघारही घेतली आहे. मात्र, शुभांगी पाटील नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शुभांगी पाटील यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून भाजपनेही प्रयत्न सुरू केले आहेत. गिरीश महाजन नाशिकमध्ये आले होते. सत्यजित तांबे यांची बिनविरोध निवड करण्यासाठी हे प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे.

महत्वाच्या बातम्या