Job Alert | 10 वी उत्तीर्ण असलेल्यांना सरकारी नोकरीची संधी, मिळेल ‘इतका’ पगार

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी सरकार नोकरीची संधी (Job Opportunity) उपलब्ध करून देत आहे. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने जनरल रिझर्व इंजिनियर फोर्सच्या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 567 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार या bro.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 567 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये रेडिओ मेकॅनिक, ऑपरेटर कम्युनिकेशन, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, वाहन मेकॅनिक, MSW ड्रिलर, MSW मेसन, MSW पेंटर, MSW वेटर इत्यादी पदांचा समावेश आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतील.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर या भरती प्रक्रियेच्या इतर पदांसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार bro.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी वय वर्ष 18 ते वय वर्ष 27 असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फी म्हणून 50 रुपये भरावे लागणार आहेत. तर आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी कोणताही शुल्क भरावा लागणार नाही.

या भरती प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाणार आहे. यामध्ये उमेदवाराला 25,000 ते 81,100 रुपयांपर्यंत वेतन दिले जाऊ शकते. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 13 फेब्रुवारी 2022 पर्यंत या bro.gov.in अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

महत्वाच्या बातम्या