Sudhir Tambe | काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर सुधीर तांबे म्हणाले, “चौकशी होईपर्यंत…”

Sudhir Tambe | मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र उमेदवारी देऊनही अर्ज न दाखल केल्यामुळे पक्षाकडून सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली आहे. त्यांच्याविरोधात चौकशी प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे. काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई केल्यानंतर सुधीर तांबे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

“मी लहानपणापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मला कारवाईबाबत समजलं, पण या प्रकरणी मला चौकशी होईपर्यंत काहीच बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया डॉ. सुधीर तांबे यांनी प्रतिक्रियी दिली आहे.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती. सुधीर तांबे यांनी एबी फॉर्म दिला असतानाही त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. सुधीर तांबे यांनी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांना अपक्ष अर्ज भरण्यासाठी मदत केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि पक्षाकडूनही सुधीर तांबे यांच्यावर कारवाई करण्यात आली.

“डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांनी अर्ज न भरता मुलाला अर्ज भरायला लावला. ही पक्षासोबत फसवेगिरी आहे. तर सत्यजीत तांबे यांनी आपण भाजपचा पाठिंबा घेणार असल्याचे विधान केले. तांबे पिता-पुत्रांनी पक्षासोबत मोठा दगाफटका केला आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.