Chitra Wagh । औरंगाबाद : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीचा विचित्र कपड्यांवर आक्षेप घेत पोलीस तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत उर्फी जावेदला नोटीस पाठवली.
अशातच आता चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा उर्फीवर ताशेरे ओढले आहेत. “आज जर हिला थांबवलं नाही तर, अजून दहा जणी नागड्या फिरतील”, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी उर्फीला पुन्हा एकदा सुनावलं आहे. औरंगाबादमध्ये एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना चित्रा वाघ यांनी उर्फीबद्दल हे भाष्य केलं आहे.
त्या म्हणाल्या,”महाराष्ट्रातील एका महिलेनं मला उर्फीचा एक व्हिडीओ पाठवला. त्या महिलेच्या नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला आहे. त्यांनी मला मेसेज पण केले. माझा या क्षेत्राची काहीही संबंध नाहीये. मला जर तुम्ही विचारलं की, बॉलिवूडबाबत तर मला सांगता येणार नाही. जेव्हा त्या महिलेनं उर्फीच्या व्हिडीओच्या लिंक्स पाठवल्या, तेव्हा मी पाहिलं की, एक बाई उघड्या नागड्या परिस्थितीमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरतीये. बाकीचे फोटो पाहिले तर ते आणखी भयानक होते. कुठलाही धर्म असे कपडे घालण्याची शिकवण देत नाही.”
पुढे त्या म्हणाल्या, “उर्फीमुळे विकृती वाढते. विरोध व्यक्तीला नाही तर त्या व्यक्तीच्या प्रकृतीला आहे. ही महाराष्ट्रची संस्कृती नाही. मुंबईच्या रस्त्यावरचा नंगानाच थांबला नाही तर त्याचं लोण औरंगाबादमध्येही पसरेल. जिन्स पॅन्ट घालणं आणि उर्फी जे घालते ते वेगळं आहे. मी एवढी निर्लज्ज बाई पाहिली नाही.”
त्याचबरोबर आम्ही स्वैराचाराच्या नावावर डोळे बंद करुन बसणार नाही, असा इशाराही चित्रा वाघ यांनी उर्फीला दिला आहे. उर्फीला जेलमध्ये टाकणं हा माझा मोटो नाहीये. इतर प्रश्न देखील आहे, त्यावर देखील आम्ही काम करत आहोत. आज जर हिला थांबवलं नाही तर, अजून दहा जणी नागड्या फिरतील, असंही चित्रा वाघ (Chitra Wagh) यावेळी बोलताना म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Sharmila Thackeray | “मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया
- Upcoming Car | Auto Expo 2023 नंतर लाँच होऊ शकतात ‘या’ कार
- Sanjay Raut | “सोड रे xxx आहे तो”; नारायण राणेंबद्दल बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली
- Health Tips | दररोज नाश्त्यामध्ये पोहे खात आहात?, तर आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम
- Urfi Javed | उर्फीच्या जीवाला कुणापासून धोका? महिला आयोगाकडे केली तक्रार