Sanjay Raut | “सोड रे xxx आहे तो”; नारायण राणेंबद्दल बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली

Sanjay Raut | मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. आज माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने स्वित्झर्लंड येथील डाव्होस इथं आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रवाना झाले आहे. त्यांच्या या दौऱ्यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली.

“दावोसवरुन काय येईल, हे आम्हाला माहीत नाही. ‘वेदांता फॉक्सकॉन, एअरबस प्रकल्प जे आधी आले होते आणि येणार होते ते प्रकल्प आणून दाखवा. दावोसला जाण्याऐवजी तुम्ही गुजरातला जा”, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना लगावला आहे.

कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, सरकार संपूर्ण न्याय यंत्रणा ताब्यात घेण्याची तयारी करत आहे. वृत्तपत्र, प्रशासन असेल हे सगळं ताब्यात गेले आहे. आता फक्त न्यायव्यवस्थेवरच हातोडा मारण्याचे बाकी आहे, तेच काम सुरू आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.