Upcoming Car | Auto Expo 2023 नंतर लाँच होऊ शकतात ‘या’ कार

Upcoming Car Launch | टीम महाराष्ट्र देशा: ऑटो एक्स्पो 2023 (Auto Expo 2023) मध्ये अनेक मोठ्या वाहन निर्मात्यांनी सहभाग घेतला आहे. अनेक वाहन उत्पादन कंपन्यांनी आपल्या उत्कृष्ट कार यामध्ये लाँच केल्या आहे. तर अनेक स्टार्टअप कंपन्यांनीही आपल्या कार आणि बाईक ऑटो एक्स्पोमध्ये सादर केल्या आहेत. ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आलेल्या काही कार ऑटोमेकर्स लवकरच बाजारामध्ये लाँच करणार आहेत.

मारुती सुझुकी फ्रॉन्क्स (Maruti Suzuki Fronx)

मारुती सुझुकीने ऑटो एक्स्पोच्या दुसऱ्या दिवशी ही कार सादर केली आहे. कंपनीने या कारची बुकिंग सुरू केली आहे. ही कार बाजारामध्ये उत्कृष्ट फीचर्ससह येणार आहे. यामध्ये हेड-अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, 9-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, क्रूझ कंट्रोल, 6 एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, हिल होल्ड असिस्ट इत्यादी आकर्षक वैशिष्ट्य मिळतील. या कारमध्ये 1.0L टर्बो पेट्रोल इंजिन उपलब्ध असेल, जे 148Nm टार्क निर्माण करू शकेल.

मारुती सुझुकी जिमनी (Maruti Suzuki Jimny)

कार प्रेमी गेले अनेक दिवस झाले या गाडीची वाट बघत होते. ऑटो एक्स्पो 2023 मध्ये या गाडीला बघण्यासाठी हजारो लोक जमले होते. कंपनीने या गाडीचा लुक अतिशय आकर्षक बनवला आहे. या कारची बुकिंग कंपनीने सुरू केली आहे. या कारमध्ये 1.5L NA पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे, हे इंजिन 105PS पॉवर आणि 135Nm टार्क निर्माण करू शकेल.

टाटा अल्ट्रोझ सीएनजी (Tata Altroz CNG)

टाटा अल्ट्रोझ सीएनजीपूर्वी कंपनीने दोन सीएनजी प्रकार सादर केले आहेत. कंपनीने ऑटो एक्सपोमध्ये नवीन ट्वीन सिलेंडर सेटअपसह टाटा अल्ट्रोझ सीएनजीचे अनावरण केले आहे. या कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह उपलब्ध आहे. हे इंजिन 77PS पॉवर आणि 96Nm टार्क निर्माण करू शकेल.

महत्वाच्या बातम्या