Sharmila Thackeray | मुंबई : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) आणि भाजपाने नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यामधील वाद अद्याप संपलेला नाही. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद विरोधात पोलीस तक्रार दाखल केली होती. तर दुसरीकडे उर्फीने चित्रा वाघ यांना सोशल मीडियावर डिवचलं होतं.
उर्फीवरून चित्रा वाघ यांनी महिला आयोगालाही प्रश्न विचारला होता. तेव्हा महिला आयोगाने चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीवरून चित्रा वाघ आणि महिला आयोग यांच्यामध्ये वाद निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत आता उर्फी जावेद (Urfi Javed) ने चित्रा वाघ यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, उर्फी जावेद वादावर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शर्मिला ठाकरे नवी मुंबईत क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांनी सामन्याच्या आयोजकांचे कौतूक केले. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना उर्फी जावेद प्रकरणावर प्रश्न विचारला असता एका वाक्यात याचं उत्तर देत अधिक बोलणं टाळलं. या प्रश्नाचे उत्तर देताना “मी पूर्ण कपड्यांत फिरते. बाकीच्यांचे मला माहीत नाही,” असे शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) म्हणाल्या.
दरम्यान, या प्रकरणाची आता पोलिसांनीदेखील दखल घेतली असून उर्फीने मुंबई पोलिसांकडे जबाब नोंदवला आहे. ती म्हणाली, “माझ्या पसंतीने मला कपडे घालण्याचा अधिकार आहे. व्हायरल फोटोंना मी थांबवू शकत नाही. कामासाठी लागतात, असे कपडे मी घालते. मला माझ्या पसंतीने कपडे घालण्याचा, वागण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. तो अधिकार मला राज्यघटनेनं दिलाय. मी जे कपडे घातले ते माझ्या पसंतीचे घालते. माझ्या असे कपडे घालण्यावर माझ्या घरच्यांचा अजिबात आक्षेप नाही”, असंही उर्फी जावेद (Urfi Javed) ने जबाबात म्हंटल आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Upcoming Car | Auto Expo 2023 नंतर लाँच होऊ शकतात ‘या’ कार
- Sanjay Raut | “सोड रे xxx आहे तो”; नारायण राणेंबद्दल बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली
- Health Tips | दररोज नाश्त्यामध्ये पोहे खात आहात?, तर आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम
- Urfi Javed | उर्फीच्या जीवाला कुणापासून धोका? महिला आयोगाकडे केली तक्रार
- Yuvraj Singh | वनडे क्रिकेट संपणार? युवराज सिंगने व्यक्त केल्या भावना