Gulabrao Patil | जळगाव : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांसह बंड पुकारला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेतच दोन वेगळे गट तयार झाले. उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा कलगीतुरा राज्यात रंगला आहे. त्यानंतर शिंदेंनी भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या 40 आमदारांमध्ये असलेले गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मनातील खंत बोलून दाखवली आहे.
ते म्हणाले, “मी भगोडा नव्हतो, मी जाऊन सांगून आलो होतो. मी जाण्याआधी सांगायला गेलो की हे दुरुस्त केलं नाही तर काहीतरी होईल.” यावेळी बोलतांना गुलाबराव पाटलांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पहाटेच्या शपथविधीचीही आठवण करून दिली.
“अजित पवार यांनीदेखील पहाटे शपथ घेतली होती, त्यांनाही दुरुस्त करून संध्याकाळपर्यंत आणता आलं. हा प्रयत्न जर आमच्या नेत्यांनी केला असता तर कदाचित ही वेळ आली नसती, पण ऐकण्याची मानसिकता असावी लागते”, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.
“कधी कधी ग (गर्व) फार नडतो. पस्तीस वर्ष एकाच घरात राहिल्यामुळे जास्त बोलायची इच्छा होत नाही, मात्र वेळ येईल तेव्हा बोलेन”, असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Pathaan Controversy | “हा नंगा नाच जर…”; भगव्या बिकिनीच्या वादावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
- Sanjay Raut | “भाजपला पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचं काहीच पडलं नाहीये का?”; संजय राऊतांचा सवाल
- Sudhir Tambe | काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर सुधीर तांबे म्हणाले, “चौकशी होईपर्यंत…”
- Amazon Prime Subscription | मनोरंजनामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही, Amazon Prime घेऊन येत आहे ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन
- Chitra Wagh । “आज हिला थांबवलं नाही तर अजून दहा जणी…”; चित्रा वाघ उर्फीबद्दल नेमकं काय म्हणाल्या?