Amazon Prime Subscription | मनोरंजनामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही, Amazon Prime घेऊन येत आहे ‘हा’ सर्वात स्वस्त प्लॅन

Amazon Prime Subscription | टीम महाराष्ट्र देशा: वाढत्या तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झाले आहे. पूर्वी लोक चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपटाचा आनंद घेत होते. मात्र, आता ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मच्या आगमनानंतर सर्व काही बदलले आहे. ओटीटीच्या माध्यमातून लोक आता घर बसल्या नवीन चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद घेतात. अशा परिस्थितीत ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण ॲमेझॉन प्राईम लवकरच सर्वात स्वस्त सबस्क्रीप्शन प्लॅन घेऊन येणार आहे. ‘Prime Lite’ च्या नावाने या सबस्क्रीप्शनची चाचणी सुरू आहे. हा प्लॅन 999 मध्ये उपलब्ध असेल. या प्लॅननंतर तुमच्या मनोरंजनामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही.

ॲमेझॉन प्राईमने डिसेंबर 2021 मध्ये सबस्क्रीप्शन पॅकची किंमत वाढवली होती. 1499 रुपयांमध्ये वापरकर्त्यांना वर्षभरासाठी सबस्क्रीप्शन मिळत होते. मात्र, आता प्राईम लाईट सबस्क्रीप्शनमुळे वापरकर्ते अमेझॉन प्राईमचा 999 रुपायांमध्ये वर्षभर आनंद घेऊ शकतील. मीडिया रिपोर्टनुसार, कंपनी ॲमेझॉन प्राईम लाईट प्लॅन 999 मध्ये सादर करू शकते. या प्लॅनमुळे वापरकर्त्यांना थेट पाचशे रुपयांचा फायदा होणार आहे. या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना काही फायद्यांवर तोटा सहन करावा लागू शकतो.

  • या प्लॅनमध्ये व्हिडिओ रिझोल्युशन SD असेल. या प्लॅनमध्ये तुम्ही एका वेळा फक्त दोन डिव्हाईस वापरू शकतात.
  • या प्लॅनमध्ये तुम्हाला थेट प्रक्षेपण बघता येणार नाही.
  • ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रीप्शनमध्ये प्राईम म्युझिक, प्राईम गेमिंग यासारखे फायदे मिळणार नाही.

ॲमेझॉन प्राईम लाईट प्लॅन तुम्ही मोबाईलसह टीव्ही किंवा कॉम्प्युटरवर देखील वापरू शकतात. सध्या या प्लॅनची बीटा चाचणी सुरू आहे. त्यामुळे हा प्लॅन सध्या ठराविक वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. पण लवकरच कंपनी हा प्लॅन सर्वांसाठी घेऊन येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.