Ajit Pawar | पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी थोडक्यात बचावले आहेत. शनिवारी बारामतीमधील एका रुग्णालयाच्या उद्घाटनचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. या घटनेबाबत अजित पवारांनी रविवारी एका कार्यक्रमामध्ये माहिती दिली.
“मला अकरा वाजेपर्यंत मुंबईत पोहोचायचं आहे. रात्री प्रवास केल्यानंतर कसे अपघात होतात? हे आपण पाहत आहोत. काल माझीही लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. याबद्दल काल मी कुठे बोललो नाही. तुम्ही घरचे आहात म्हणून बोलतोय”, असेही अजित पवारांनी सांगितले आहे.
“बारामतीत मी एका रुग्णालयाचं उद्घाटन केलं. यावेळी लिफ्टमध्ये शिरल्यानंतर शिफ्ट बंद पडली. लिफ्ट वर जात नव्हती. तेवढ्यात लाईट गेली. लिफ्टमध्ये अंधार पडला आणि लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. खोटं नाही सांगत पण आज श्रद्धांजलीचाच कार्यक्रम झाला असता. सुरक्षारक्षकांनी दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढलं. याबद्दल मी कुणालाच बोललो नाही. परमेश्वराची कृपा आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी बचावलो,” असा खुलासा अजित पवारांनी केला.
महत्वाच्या बातम्या :
- Sudhir Tambe | काँग्रेसने निलंबनाची कारवाई केल्यानंतर सुधीर तांबे म्हणाले, “चौकशी होईपर्यंत…”
- Sanjay Raut | “भाजपला पंतप्रधान पदाच्या प्रतिष्ठेचं काहीच पडलं नाहीये का?”; संजय राऊतांचा सवाल
- Chitra Wagh । “आज हिला थांबवलं नाही तर अजून दहा जणी…”; चित्रा वाघ उर्फीबद्दल नेमकं काय म्हणाल्या?
- PM Kisan Yojana | ‘या’ आठवड्यात येणार 13 वा हप्ता, शेतकऱ्यांनी लवकर करून घ्या ‘ही’ कामं
- Sharmila Thackeray | “मी पूर्ण कपड्यांत फिरते, बाकीच्यांचे…”; उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया