Share

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे परत येईल, अशी माहिती जय पवार यांनी दिली असून त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्याचं सांगितलं आहे.

Published On: 

अर्थखातं पुन्हा राष्ट्रवादीकडे? जय पवार यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याची माहिती

मुंबई : अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं दिसत आहे. उपमुख्यमंत्रीपदासह अर्थखात्याची (Finance Department) जबाबदारी पूर्वी अजित पवार यांच्याकडे होती. त्यांच्या निधनानंतर हे खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी स्वतःकडे ठेवले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनीच अर्थसंकल्प सादर केला होता.

दरम्यान, अर्थखातं (Finance Department) पुन्हा राष्ट्रवादीकडे जाण्याची चर्चा सुरू होती, मात्र अद्याप त्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर बारामतीत आयोजित कृतज्ञता स्नेहमेळाव्यात जय पवार यांनी यावर महत्त्वाचं वक्तव्य केलं.

कार्यक्रमात बोलताना जय पवार यांनी सांगितलं की, “दादा आपल्याला सोडून जातील असं कुणालाही वाटलं नव्हतं. अर्थखातं आपल्याकडे नसल्याने विकासकामे रखडली आहेत, पण तसं नाही.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, अर्थसंकल्प सादर करण्यासाठी हे खातं मुख्यमंत्रीकडे ठेवण्यात आलं होतं.

जय पवार यांनी पुढे सांगितलं की, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून अर्थखातं लवकरच राष्ट्रवादीकडे परत येईल. तसेच त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीतील विजयाबद्दलही आभार व्यक्त केले. बारामतीत अजित पवार यांचं स्मारक उभारलं जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही