Sarfaraz Khan | टीम इंडियात निवड न झाल्यानंतर सरफराजने निवड समितीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sarfaraz Khan | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला आहे. संघ जाहीर झाल्यापासून सरफराज खान (Sarfaraz Khan) चे नाव चर्चेत आले आहे. सरफराजने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगल्या धावा केल्या आहेत. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत सरफराज खाने निवड समितीबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

सरफराज खान म्हणाला, “निवड समिती मला बांगलादेश दौऱ्यावर खेळण्याची संधी देणार होती. मात्र, या दौऱ्यावर वरिष्ठ संघामुळे खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर मी लगेचच समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांची भेट घेतली होती.”

माध्यमांशी बोलताना सरफराज म्हणाला, “बंगळुरुमध्ये रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये मी शानदार शतक केले. त्यानंतर मी निवडकर्त्यांची  भेट घेतली होती. तेव्हा मला निवड समितीने सांगितले होते, तुला बांगलादेशात संधी मिळेल त्यासाठी तू तयार रहा. अलीकडेच मी चेतन शर्मा सर यांची भेट घेतली होती. तेव्हा त्यांनी मला निराश न होण्यास सांगितले होते. चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो तुला लवकरच संधी मिळेल, असे ते मला यावेळी म्हणाले होते.”

पुढे बोलताना सरफराज म्हणाला, “संघ जेव्हा जाहीर झाला तेव्हा त्यामध्ये माझे नाव नव्हते. ते बघून मला खूप वाईट वाटले. त्यावेळी तिथे माझ्या जागी कुणीही असते तर त्याला दुःख झाले असते. कारण मला यावेळी खेळण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. पण तसे झाले नाही. काल या निर्णयानंतर मला खूप एकट वाटत होतं.”

महत्वाच्या बातम्या