Amruta Fadanvis | टीम महाराष्ट्र देशा: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) नेहमी चर्चेत असतात. अमृता फडणवीस सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्या अनेकदा आपले मत व्यक्त करतात. त्याचबरोबर त्या सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांनी नुकताच मकर संक्रांतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओनंतर नेटकरी त्यांना ट्रोल करत आहे.
अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्या पतंग उडवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहे. त्यांच्या शुभेच्छांना बघून नेटकरी त्यांना ट्रोल करत आहे. या व्हिडिओमध्ये असलेल्या त्यांचा पेहराव्यावर आणि मराठी भाषेवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या व्हिडिओवरील कमेंट्स
असल्या कपड्यात असते का संक्रात. नवरा तर हिंदुत्वाच्या बोंबा मारतोय.
आम्ही तीळगूळ घेऊन गोड गोड बोलूचं ओ पण तुम्ही तर मराठीमध्ये नीट बोला 🙌
Amruta Fadanvis | "नवरा हिंदुत्वाच्या बोंबा…" ; मकर संक्रांतीच्या शुभेच्छांवरून अमृता फडणवीस ट्रोलhttps://t.co/yQHL5ikB8r
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) January 16, 2023
अमृता फडणवीस यांच्या व्हिडिओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “आम्ही तिळगुळ घेऊन गोड बोलू पण तुम्ही मराठी नीट बोला.” तर अजून एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, “असल्या कपड्यात संक्रांत असते का, नवरात्र हिंदुत्वाच्या बोंबा मारतोय.” अमृता फडणवीस यांच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट करत त्यांना ट्रोल करत आहे.
अमृता फेडणवीस पेशाने बँकर आहेत. त्याचबरोबर त्या गायिका देखील आहे. त्यांनी गायलेली अनेक गाणी प्रेक्षकांना पसंत देखील पडली आहे. त्यांच्या ‘वो तेरे प्यार का गम’, ‘तेरी मेरी फिर से’ या गाण्यांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
महत्वाच्या बातम्या
- Shubhangi Patil | काल पाठिंबा अन् आज गायब, ठाकरे गटाच्या शुभांगी पाटील नॉट रिचेबल
- Girish Mahajan | शुभांगी पाटील नॉट रिचेबल; गिरीश महाजन म्हणाले, “त्या काही फार मोठ्या…”
- Sarfaraz Khan | टीम इंडियात निवड न झाल्यानंतर सरफराजने निवड समितीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाला…
- Job Alert | 10 वी उत्तीर्ण असलेल्यांना सरकारी नोकरीची संधी, मिळेल ‘इतका’ पगार
- Gulabrao Patil | “पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांनाही परत आणलं, पण…”; गुलाबराव पाटलांनी व्यक्त केली खंत