Pankaja Munde | पंकजा मुंडेंचा भाजपला रामराम?; ठाकरे गटाच्या ‘या’ बड्या नेत्याकडूनही खुली ऑफर

Pankaja Munde | मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा राजकारणात चांगलीच रंगली आहे. त्यातच ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी पंकजा मुंडेंना ठाकरे गटात येण्याची खुली ऑफर दिली. त्यावरुन भाजपकडून ‘त्या कुठेही जाणार नाहीत’, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यातच आता ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर खैरे यांनी देखील पंकजा मुंडेंना पक्षात घेण्याबाबत मोठं वक्तव्य केल्याचे पाहायला मिळालं आहे.

“पंकजा मुंडे या पक्षात आल्या तर त्यांचं आम्ही स्वागत करु”, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी पंकजा मुंडेंना अप्रत्यक्षपणे ठाकरे गटात येण्याची ऑफर दिली आहे. ठाकरे गटाकडून दुसऱ्यांदा ऑफर आल्यानंतर याबाबत पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

“गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराकडे दुर्लक्ष करण्याचे काम भाजपच्या नेत्यांकडून सुरू आहे. मी इथे स्पष्ट सांगतो की, सध्याच्या घडीला पंकजा मुंडे यांना दूर करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे किंवा इतर कोणत्या नेत्यांने पंकजा मुंडेंना दूर केले असेल”, असेही चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

“सध्या भाजपमध्ये मुंडे परिवाराला डावलण्याचे काम सुरू आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पंकजा मुंडे आमच्या पक्षात आल्या तर आम्ही त्यांचे स्वागतच करतो. पण त्यांना पक्षात घेण्याचा पूर्ण अधिकार उद्धव ठाकरे यांना आहे. उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडे यांना बहीण मानले आहे. त्यामुळे त्यांना ठाकरे गटात घेण्यास काहीच हरकत नाही,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.