Kirit Somaiya | “हसन मुश्रीफांनी जावयाला दरवर्षी हुंडा म्हणून…”; किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप

Kirit Somaiya | कोल्हापूर : माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अनेक कंपन्या आणि कार्यालयावर ईडीने मिया धाडी टाकल्या आहेत. रजत कंजुमर आणि माऊंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांच्या खात्यावरून ४९ कोटी ८५ लाख रुपये मुश्रीफ कुटुंबाच्या खात्यावर आले. त्यावर हसन मुश्रीफ काय बोलत नाहीत असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे.

सोमय्या यांनी कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर अंबाबाईचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेत मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ग्रामविकास मंत्री असताना मुश्रीफ यांनी रद्द केलेल्या आदेशाचा तपास होणार असल्याचे किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले.

पुढे ते म्हणाले, “आपल्या जावयासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीवर जिझिया कर लावण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने ५० हजार रुपये जावयाच्या कंपनीला देण्याचा आदेश मुश्रीफांनी काढला. त्यामुळे दरवर्षी १५० कोटी रुपयांचा भुर्दंड सरकारला बसणार होता. आम्ही हा घोटाळा समोर आल्यावर कंत्राट रद्द करण्यात आलं. पण, याची संपूर्ण चौकशी होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वचन दिलं आहे. हुंडा म्हणून हसन मुश्रीफांनी जावयाला प्रत्येक वर्षी १५० कोटी रुपये दिले.”

“रजत प्राव्हेट लिमिटेड, माऊंट प्रायव्हेट लिमिटेडचा मुश्रीफ साहेब यांच्या कंपन्याशी काय संबंध आहे? अस्तित्वात नसणाऱ्या कंपनीमार्फत 49 कोटी 85 लाख रुपये कसे मिळतात? हे मुश्रीफ यांनी सांगावं”, असं किरीट सोमय्या म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.