Share

Prithviraj Chavan । “सत्यजीत तांबेंचं निलंबन होणार?”; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

Prithviraj Chavan । मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणं आता काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या चांगलच अंगलट येणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ‘सत्यजित तांबे यांना पक्षातून निलंबित करा’, अशा सूचनाच काँग्रेस (INC) हायकमांडने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसला दिल्या आहेत. त्यामुळे सत्यजित तांबे यांना कोणत्याही क्षणी निलंबित करण्यात येणार असल्याचं दिसत आहे. यावर  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, “सुधीर तांबेंना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने तिकीट दिलं होतं. त्यामुळे या शिस्तभंगाचा आणि शिस्तपालनाचा संबंध दिल्लीशी संबंधित आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीला काही शिफारस करू शकतात. मात्र, अंतिम निर्णय एआयसीसीच करेल.” कोणत्याही परिस्थितीत ही जागा भाजपाच्या विचाराच्या लोकांच्या हातात ही जागा जाऊ नये आणि मविआच्या कुठल्याही एका उमेदवाराला सर्वांना समर्थन करावं, अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. आता ती चर्चा संपली असेल, असंही ते यावेळी बोलताना म्हणालेत.

सुधीर तांबे यांच्या निलंबनाचा निर्णयही केंद्रीय शिस्तपालन समितीने घेतला होता. त्या समितीचे सचिव तारिक अन्वर आहेत. त्यांच्या सहीने सुधीर तांबेंच्या निलंबनाचं पत्र निघालं आहे. त्यामुळे आणखी कोणाचं निलंबन करायचं असेल तर त्यांच्या सहीनेच होणार असल्याची माहिती पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी दिलीय.

दरम्यान, रविवारी सत्यजित तांबे यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. सुधीर तांबे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तांबे पितापुत्रांना मोठा झटका बसल्याचे दिसत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत सलग तीन वेळा आमदार राहिलेले डॉ. सुधीर तांबे यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा आदेश झुगारुन सुधीर तांबे यांनी त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला आणि तिथूनच राजकीय वातावरणात बदलाला सुरवात झाली.

महत्वाच्या बातम्या :

Prithviraj Chavan । मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बंडखोरी करणं आता काँग्रेस नेते सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या चांगलच …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now