Share

पवनराजे निंबाळकर केसचा अंतिम क्षण; ओमराजेंची कोर्टात हजेरी, निकालाकडे राज्याचे लक्ष

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाची आज सत्र न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होत असून निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. खासदार ओमराजे निंबाळकर न्यायालयात उपस्थित असून, सुनावणीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाबाहेर शिवसैनिकांची गर्दी झाली आहे. या निर्णयाकडे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Published On: 

मुंबई : बहुचर्चित पवनराजे निंबाळकर (Pawanraje Nimbalkar) हत्याकांड प्रकरणाची आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणातील निकाल आज जाहीर होण्याची शक्यता असून, सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले आहे.

या सुनावणीसाठी खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) हे न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. ओमराजे निंबाळकर हे दिवंगत पवनराजे निंबाळकर यांचे पुत्र आहेत. न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये पद्मसिंह पाटील यांच्यासह अन्य आरोपींचा समावेश आहे.

दरम्यान, सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सत्र न्यायालयाच्या परिसरात शिवसैनिक मोठ्या संख्येने जमले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालय परिसरात सुरक्षेची खबरदारी घेण्यात आली आहे.

पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय देते, याकडे धाराशिवसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही