Share

पवनराजे निंबाळकर हत्याकांडात पद्मसिंह पाटील दोषमुक्त, २० वर्षांनंतर निकालात नेमकं काय घडलं?

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणी सीबीआय कोर्टाने माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. तपासातील त्रुटींवर न्यायालयाने ताशेरे ओढले.

Published On: 

Pawanraje Nimbalkar Case - CBI court verdict acquitting Padmasinh Patil

मुंबई – २० वर्षे जुनं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणारं पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा आज बहुचर्चित खटल्याचा अंतिम निकाल आला असून, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे.

सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी हा ऐतिहासिक निकाल सुनावला. पुराव्यांचा अभाव आणि माफीच्या साक्षीदाराची संशयास्पद साक्ष यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना संशयाचा फायदा दिला आहे. त्यामुळे खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबाला हा मोठा कायदेशीर धक्का मानला जातोय.

Pawanraje Nimbalkar Case

या संपूर्ण खटल्याचा डोलारा पारसमल जैन या माफीच्या साक्षीदारावर उभा होता. पण त्याची साक्षच कोर्टात टिकली नाही. तपासातील ढिसाळ कारभारावर न्यायाधीशांनी कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत.

गुन्हे शाखेने साक्षीदाराला बेकायदेशीरपणे १५ दिवस डांबून ठेवले आणि मारहाण करून जबाब घेतल्याचे उघड झाले. दुसरीकडे, या साक्षीदाराकडे स्वतःची घरे, मिठाईची दुकाने आणि साडेचार किलो सोनं असताना त्याने केवळ ५० हजार रुपयांसाठी एवढा मोठा खून केला, ही थिअरी कोर्टाला पटली नाही.

तपासात पोलिसांकडून मोठ्या घोडचुका झाल्याचेही समोर आले. कुणाही आरोपीचे मोबाईल जप्त केले नाहीत किंवा त्यांचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले गेले नाहीत. त्यामुळे आरोपींचा एकमेकांशी संपर्क होता, हे सरकारी पक्ष सिद्धच करू शकला नाही.

हत्येच्या रात्री मुंबईबाहेर कसे पळालो, याच्या चार वेगवेगळ्या कहाण्या माफीच्या साक्षीदाराने सांगितल्या. तसेच, गुन्ह्यात वापरलेली गाडी जळून खाक झाली असताना पंचनाम्यात तिचा रंग ‘हिरवा’ कसा लिहिला गेला, असा थेट सवाल कोर्टाने विचारला.

पवनराजे आणि पद्मसिंह पाटील यांच्यात तेरणा साखर कारखान्यावरून राजकीय वैर होते, हे न्यायालयाने मान्य केले. पण केवळ राजकीय दुश्मनी आहे, म्हणून भक्कम पुराव्यांविना कुणाला फासावर लटकवता येणार नाही, असे स्पष्ट करत कोर्टाने सर्व आरोपींची मुक्तता केली.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही