Share

प्रिती झिंटाचा गुगल, मेटा विरोधात मोठा विजय, हायकोर्टाच्या एका निर्णयानं भल्याभल्या कंपन्यांचे धाबे दणाणले

एआय आणि डीपफेकच्या गैरवापर प्रकरणी अभिनेत्री प्रिती झिंटा आता थेट गुगल आणि मेटासारख्या मोठ्या टेक कंपन्यांविरोधात कायदेशीर लढा देणार आहे.

Published On: 

Preity Zinta Deepfake Case - Bombay HC allows Preity Zinta to sue Google and Meta.

इंटरनेटवर आजकाल कोणाचाही खोटा व्हिडीओ कधी व्हायरल होईल, याचा काहीच नेम राहिलेला नाही. पण तुमच्या परवानगीशिवाय जर तुमचा चेहरा किंवा आवाज वापरला गेला, तर थेट गुगल आणि मेटासारख्या बलाढ्य कंपन्यांना कोर्टात खेचता येतं, हे तुम्हाला माहितीये का?

बॉलिवूडची ‘डिंपल गर्ल’ प्रिती झिंटाने (Preity Zinta) अगदी हेच करून दाखवलंय. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच तिला गुगल एलएलसी (Google LLC), मेटा (Meta) आणि इतर काही बड्या कंपन्यांविरोधात अधिकृत खटला दाखल करण्याची परवानगी दिली आहे. एआय (AI) आणि डीपफेकचा (Deepfake AI) चुकीचा वापर केल्याप्रकरणी हा अत्यंत मोठा निर्णय मानला जात आहे.

Preity Zinta Deepfake Case

प्रितीच्या वतीने वकील रोहन कदम यांनी कोर्टात अत्यंत भक्कमपणे बाजू मांडली. त्यांच्या युक्तिवादानुसार, या प्लॅटफॉर्म्सवर एआयच्या मदतीने प्रितीचे डीपफेक व्हिडीओ, मीम्स आणि चुकीचे फोटो बिनदिक्कतपणे पसरवले गेले. यामुळे तिच्या प्रतिष्ठेला, व्यक्तिमत्त्वाला आणि कॉपीराइट अधिकारांना मोठा धक्का पोहोचला आहे.

न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाने मंगळवारी प्रितीला हा खटला दाखल करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला. प्रिती भारताची नागरिक असून ती मुंबईत राहते, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात हा विषय येतो, असा युक्तिवाद वकिलांनी केला.

हे सर्व खोटे व्हिडीओ फक्त मुंबईतच नाही, तर ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून जगभरात पाहिले जात होते, याची गंभीर नोंदही कोर्टाने घेतली आहे. दुसरीकडे, सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता गैरवापर ही जगभरात एक मोठी डोकेदुखी ठरलीये.

संमती नसताना हुबेहूब नक्कल करणारे व्हिडीओ बनवण्याचं प्रमाण भयंकर वाढलंय. पण आता प्रितीने थेट या टेक कंपन्यांनाच कायदेशीर लढाईसाठी आव्हान दिल्याने, या प्रकरणाचा निकाल नेमका काय लागतो, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही