Prakash Ambedkar | “राधाकृष्ण विखे पाटील भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील फडणवीसांना कदाचित…”- प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar | औरंगाबाद : सध्या  विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांबाबत मोठा दावा केला आहे.

“भाजपकडून मोठी खेळी सूरू असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे”, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आबंडेकर यांनी केला आहे. ते औरंगाबादेत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाशी होणाऱ्या युतीबाबतही भाष्य केले.

“विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून वेगळी खेळी सूरू आहे. भाजप राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याच्या प्रयत्नात आहे. मी जे बोलतो आहे, ते देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) आवडणार नाही, पण राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकतात”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

दरम्यान, “अहमदनगरमध्येही मोठं राजकारण सुरू असून बाळासाहेब थोरतही मुख्यमंत्रिपदासाठी प्रयत्न करत आहेत”, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

“आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आम्ही सोबत लढणार आहोत. त्यासाठी जागा वाटपही निश्चित झाले आहे. तसेच आमची युती 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतही कायम राहणार आहे. या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असतील का? याबाबत उद्धव ठाकरे निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या 

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.