Share

Narayan Rane | “शिवसेनेवर भुकंण्यासाठी नारायण राणे यांना भाजपचं मंत्रिपद”; शिवसेनेची जहरी टीका

Narayan Rane | मुंबई : ठाकरे कुटुंब आणि नारायण राणे कुटुंबीयांमधील खटके उडणे काही नविन नाही. ठाकरे गट आणि राणे कुटुंब यांच्यात वारंवार टीका-टिपण्णी केली जाते. नुकताच मुख्यमंत्री पदावरूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार टीका केली होती. त्यातच अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरुनही आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप … Read more

Published On: 

Narayan Rane | मुंबई : ठाकरे कुटुंब आणि नारायण राणे कुटुंबीयांमधील खटके उडणे काही नविन नाही. ठाकरे गट आणि राणे कुटुंब यांच्यात वारंवार टीका-टिपण्णी केली जाते. नुकताच मुख्यमंत्री पदावरूनही उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर नारायण राणे यांनी जोरदार टीका केली होती. त्यातच अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरुनही आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले होते.

ठाकरे गटाचे आमदार राजन साळवे यांनी नारायण राणे यांची लायकी काढत “शिवसेनेवर भुंकण्यासाठीच नारायण राणे यांना मंत्रिपद दिले आहे”, अशी जहरी टीका राजन साळवी यांनी केली आहे.

“केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिवसेनेमुळे मंत्री, मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री झाले आहेत. मात्र ज्या शिवसेनेने त्यांना मोठे केले आहे, त्या शिवसेनेला ते विसरले आहेत”, असं म्हणत राजन साळवी यांनी टीका केली आहे.

“नारायण राणे जे आरोप करतात त्यांनी लोकांसमोर आणावे. कारण केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता आहे. मात्र ते धाडस राणे करत नाहीत कारण त्यांना सध्या पराभूत असा अनुभव येत असल्याने त्यांच्याकडून वाटेल ते आरोप केले जात आहेत”, अशी टीकाही यावेळी राजन साळवींनी केली आहे.

“नारायण राणे आज ठाकरे कुटुंबीयांवर आरोप करत असले तरी त्यांच्यामध्ये हिम्मत असेल तर त्यांनी कोकणातून लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी” असे जाहीर आव्हान राजन साळवी यांनी नारायण राणेंना केले आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे कुटुंबीय वाद आणखी शिगेला पोहचणार असल्याचे दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही