Share

Rishabh Pant | “मी सगळ्यांचा आभारी…” ; भीषण अपघातानंतर ऋषभ पंतची पहिली प्रतिक्रिया

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या गाडीचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंतने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट करून बीसीसीआय आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा … Read more

Published On: 

Rishabh Pant | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय संघातील स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या गाडीचा 30 डिसेंबर 2022 रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातानंतर ऋषभ पंतने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्याने ट्विट करून बीसीसीआय आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे.

स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा गेल्या महिन्यात कार अपघात झाला होता. या अपघातानंतर त्याच्यावर डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी आणि पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, त्याच्या पुनरागमानाबाबत आणि रिकव्हरीबद्दल रिपोर्ट्समध्ये वेगवेगळी माहिती समोर येत होती. अशा परिस्थितीत स्वतः पंतने त्याच्या प्रकृती आणि शस्त्रक्रियेबद्दल अपडेट दिली आहे. त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या प्रकृतीबद्दल अपडेट दिली आहे.

ट्विट करत ऋषभ पंत म्हणाला, “सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि पाठिंब्यासाठी मी मनापासून आभारी आहे. माझी शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. पुढील आव्हानांसाठी मी तयार आहे. बीसीसीआय, जय शहा आणि सरकारी अधिकाऱ्यांचे देखील मी मनापासून आभार मानत आहे.”

त्याचबरोबर ऋषभ पंतने ट्विटरच्या माध्यमातून चाहते, सहकारी, डॉक्टर आणि फिजिओ आदींचे आभार मानले आहे. ऋषभ पंत सध्या मुंबईत वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्याच्या प्रकृतीमध्ये दिवसेंदिवस सुधारणा होत आहे. मुंबईमध्ये त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

ऋषभ पंत 30 डिसेंबर रोजी सकाळी आपल्या आईला भेटण्यासाठी निघाला होता. दरम्यान, हम्मादपुर झाल जवळ रुरकीच्या नरसन सीमेवर वळण घेत असताना त्याच्या कारचा अपघात झाला. त्यानंतर त्याच्या गाडीला आग लागली होती. या कार अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. अपघातानंतर त्याला लगेच डेहरादून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही