Mahindra XUV 400 | ‘या’ उत्कृष्ट फीचर्ससह महिंद्राने लाँच केली इलेक्ट्रिक SUV ‘Mahindra XUV 400’

Mahindra XUV 400 | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दिवसेंदिवस इलेक्ट्रिक (Electric) वाहनांचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे. अशा परिस्थितीत देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी महिंद्राने आपली नवीन इलेक्ट्रिक एसयुव्ही (SUV) लाँच केली आहे. महिंद्रा ‘Mahindra XUV 400’ ने ही इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. कंपनीने ही कार दोन व्हेरियंटमध्ये बाजारात सादर केली आहे. यामध्ये EC आणि EL यांचा समावेश आहे.

पॉवरट्रेन

कंपनीने या इलेक्ट्रिक कारमध्ये 34.5kWh आणि 39.5kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरला आहे. हा बॅटरी पॅक IP67 रेटिंगसह उपलब्ध आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही कार इलेक्ट्रिक सेगमेंटमधील सर्वात वेगवान धावणारी कार आहे. ही कार 8.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवण्यास सक्षम आहे. ही कार जास्तीत जास्त 150 किमी प्रतितास वेगाने धावू शकते.

फीचर्स

महिंद्राच्या या इलेक्ट्रिक कारमध्ये लेदरेट सीट्स, ऑटो हेडलॅम्प्स, इलेक्ट्रिक सनरूफ, स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी, हाईट अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, रिअर आर्मरेस्ट, फ्रंट आर्मरेस्ट, इलेक्ट्रिक अॅडजस्टेबल, फोल्डेबल ORVM, रिअर वायपर, वॉशर सहा एअरबॅग्ज, ABS, EBD, ISOFIX चाइल्ड अँकरेज, रिव्हर्स कॅमेरा, ऑल व्हील डिस्क ब्रेक्स, अडॅप्टिव्ह गाईडलाईन्स इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.

चार्जिंग

महिंद्राच्या या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये तीन चार्जिंग पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये 3.3kW/16A होम चार्जर, 7.2kW/32A चार्जर आणि DC फास्ट चार्जरचा समावेश आहे. DC फास्ट चार्जरने ही कार फक्त 50 मिनिटांमध्ये चार्ज होऊ शकते. तर 7.2kW चार्जरने ही कार चार्ज होण्यासाठी 6.30 तास लागू शकतात.

किंमत

Mahindra XUV 400 या इलेक्ट्रिक एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 15.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या गाडीच्या टॉप व्हेरियंट EL ची किंमत 18.99 रुपये आहे. या गाडीची ही किंमत फक्त पहिल्या 5000 ग्राहकांसाठी वैध आहे.

महत्वाच्या बातम्या