BJP | नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर भाजप नेते मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रीया दिली. भाजपने पाठिंबा दिला तर सत्यजीत तांबे पास होतील, असे गिरीश महाजन म्हणाले.
दरम्यान, भाजपा घर फोडण्याचं काम करत आहे, असं नाना पटोले म्हणाले होते. त्यावर गिरीश महाराजांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “तुम्हाला तुमचं घर संभाळता येत नाही. तुमच्या घरातील माणसं तुम्हाला संभाळता येत नाही. सर्वजण बाहेर पडत आहेत्याला आम्ही काय करणार?, असा सवाल करत गिरीश महाजन यांनी चिमटा काढला आहे.
“उद्या एकटे नाना पटोलेच पक्षात शिल्लक राहतील, अशी शंका आहे. ते सुद्धा इकडे-तिकडे असताताच. त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण राहिल, हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे. काँग्रेसचं रामभरोसे काम सुरु आहे,” अशी बोचरी टीका गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे.
त्याचबरोबर सत्यजित तांबेंना भाजप पाठिंबा देणार का? यावर देखील महाजनांनी भाष्य केलंय. ते म्हणाले, “त्यांनी पाठिंबा मागितला तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे योग्य निर्णय घेतील. कारण, आम्हालाही जागा निवडून आणायची आहे. लवकरच यावर निर्णय होईल. तसेच, आमच्याकडे उमेदवाराची लाईनच होती. देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्या मनात वेगळी काहीतरी रणनिती असेल. त्यामुळे असा निर्णय घेण्यात आला आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar | “पलटण वाढवू नका, देवाची कृपा म्हणून…”; कुटुंबनियोजनाबाबत अजित पवारांचा महिलांना सल्ला
- Health Tips | पाण्यात मेथी उकळून प्यायल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Ambadas Danve | “मला स्वत:चं घर नाही, मी…”; अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
- Big Boss 16 | ‘बिग बॉस’मध्ये सलमान खानची जागा घेणार ‘ही’ सेलिब्रिटी, चॅनलला भेटला नवीन होस्ट?
- Girish Mahajan | “सत्यजीत तांबेंना भाजपा पाठिंबा देणार?”; गिरीश महाजन म्हणाले…