Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूडमधील ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) सतत चर्चेत असते. सध्या राखी सावंत तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. तिने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत इस्लाम पद्धतीने लग्न केलं आहे. सात महिन्यापूर्वी या दोघांनी लग्न केलं होतं. मात्र, त्याबद्दल त्यांनी कुणालाही सांगितलं नव्हतं. बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यानंतर राखीने तिच्या लग्नाचा खुलासा केला होता. आदिलने हे लग्न स्वीकारण्यास नकार दिला होता.
मात्र, नुकताच आदिल दुर्राणीने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या आणि राखीच्या लग्नाबाबत खुलासा केला आहे. आदिलसोबत लग्न झाल्यानंतर राखीने तिचं नाव बदललं आहे. लग्नानंतर राखीनं तिचं नाव ‘फाततिमा’ ठेवलं आहे. त्याचबरोबर तिने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारला आहे.
राखी सावंतने आदिलशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्म स्वीकारण्याची कबुली दिली आहे. ती म्हणाली, “मी आदिलला आणि त्यांनी मला कबूल केलं आहे. आमच्या प्रेमामध्ये कोणताही धर्म नाही. आम्ही निकाह केला आहे. लग्नानंतर आदिलने माझं नाव फातिमा ठेवलं आहे. मी हे नाव आणि इस्लाम धर्म दोन्हीही स्वीकारलं आहे. मी माझ्या पतीला मिळवण्यासाठी जे काही शक्य आहे, ते सर्व केलं आहे.”
Rakhi Sawant | "मी इस्लाम कबूल…" ; आदिलसोबत लग्न केल्यानंतर राखीने केला मोठा खुलासाhttps://t.co/Jhul2jJbDY
— Maharashtra Desha महाराष्ट्र देशा (@MHD_Press) January 17, 2023
राखी सावंत आणि आदिल गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आदिल राखीपेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहे. त्याच्याबद्दल एका मुलाखतीमध्ये राखी सावंत बोलताना म्हणाली होती, “देवाने आदिलला माझ्यासाठी पाठवलं आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी नैराश्यामध्ये होते. तेव्हा त्या कठीण काळात आदिल माझ्या आयुष्यात आला.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “शिवसेना कोणाची हा प्रश्न महाराष्ट्रात तरी उपस्थित होत नाही”- संजय राऊत
- Ajit Pawar | “पलटण वाढवू नका, देवाची कृपा म्हणून…”; कुटुंबनियोजनाबाबत अजित पवारांचा महिलांना सल्ला
- Health Tips | पाण्यात मेथी उकळून प्यायल्याने मिळू शकतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे
- Ambadas Danve | “मला स्वत:चं घर नाही, मी…”; अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?
- Big Boss 16 | ‘बिग बॉस’मध्ये सलमान खानची जागा घेणार ‘ही’ सेलिब्रिटी, चॅनलला भेटला नवीन होस्ट?