Nana Patole | “ते काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत”; राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याचा नाना पटोलेंकडून समाचार 

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nana Patole | अमरावती : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीत नाशिक, नागपूर आणि अमरावतीच्या उमेदवारीवरून बराच गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे.

यावर प्रतिक्रिया देत संजय राऊतांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला असल्याचं म्हंटल होतं. महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा दिसला. पुन्हा गोंधळ होऊ नये, हा धडा महाविकास आघाडीच्या प्रत्येक पक्षाने घेतला पाहिजे, असंही राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रत्युत्तर दिलंय.

“संजय राऊत काँग्रेसचे प्रवक्ते नाहीत. मी आज ( १७ जानेवारी ) अमरावतीत आहे. उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माहिती माध्यमांना देऊ,” असं म्हणत नाना पटोलेंनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

संजय राऊत यांचं वक्तव्य काय?

“काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला. अद्यापही तो सुरु असून, त्यात आम्हाला पडायचं नाही. शिवसेनेने शुभांगी पाटलांना पाठिंबा दिला आहे. याबद्दल काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सूचना दिल्या आहेत. महाविकास आघाडीचा निर्णय घ्यायचं, तर सर्वांनी एकत्र लढलं पाहिजे. त्यामुळे नागपूरची उमेदवारी आम्ही मागे घेतली आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :