Sushma Andhare | “निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का?”; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला संतप्त सवाल 

Sushma Andhare | बीड : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिंदे गटातच दोन गट पडले. सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला. परिणामी नेमकी शिवसेना कुणाची?, या वादाला सुरुवात झाली. यासंदर्भात बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर टीकास्त्र सोडलेत.

त्या म्हणाल्या, “काही पेड ट्रोलर्स चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण सांगतात की ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख, पक्ष बेकायदेशीर आहेत, मान्यता आम्हालाच मिळणार आहे’. संजय शिरसाटसारखा माणूस असं सांगत असेल तर मग निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितलंय का?”

“निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगताय, तर मग तुमची आणि आयोगाची साठगाठ झाली आहे का? नसेल झाली, तर तुमच्यावर खटला दाखल करावा का?” असे सवाल करत सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी शिंदे गटावर आगपाखड केली.

पुढे त्या म्हणाल्या, “वस्तुस्थिती ही आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचे आमदार किंवा खासदार किती आहेत, यावर पक्षाची मान्यता ठरत नसते. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, त्यानुसार हे मी सांगते. एखादा पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय किंवा त्या पक्षाला निवडणूक चिन्ह काय द्यायचं हे त्या पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी किती आहे, यावर ठरतं. ही मतांची टक्केवारी शिवसेनेने सिद्ध केली असल्याचं सांगत शिंदे गटाची मतांची टक्केवारी कुठे आहे?, असा सवाल त्यांनी केलाय.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.