Share

COVID-19 Variant | चीनमधल्या व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री, आढळले 3 रुग्ण

🕒 1 min read COVID-19 Variant | मुंबई: परदेशातून मुंबईमध्ये आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांमध्ये कोरोनाचा BF.7 हा व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हेरियंट कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत ठरला होता. या व्हेरियंटने आता महाराष्ट्रामध्ये एन्ट्री केली आहे. या तीन प्रवाशांपैकी दोन प्रवासी चीनमधून भारतात आले होते. तर एक कोरोना बाधित कॅनडामधून आला … Read more

Published On: 

🕒 1 min read

COVID-19 Variant | मुंबई: परदेशातून मुंबईमध्ये आलेल्या तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. या तिघांमध्ये कोरोनाचा BF.7 हा व्हेरियंट आढळून आला आहे. हा व्हेरियंट कोरोनाच्या नव्या लाटेला कारणीभूत ठरला होता. या व्हेरियंटने आता महाराष्ट्रामध्ये एन्ट्री केली आहे.

या तीन प्रवाशांपैकी दोन प्रवासी चीनमधून भारतात आले होते. तर एक कोरोना बाधित कॅनडामधून आला होता. या तिन्ही रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे. या तिघांची ही प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. तर, तिघांपैकी एकालाही रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडलेली नाही. या तिन्ही प्रवाशांमध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहे. या तिघांनीही कोरोना व्हॅक्सिनेशन केलं असल्याचं एका वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

मुंबई विमानतळावर आत्तापर्यंत आरटीपीसीआर चाचणीमध्ये 23 जण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे. या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले आहे. यामध्ये मुंबईतील पाच, गुजरातमधील चार, पुण्यातील तीन, केरळमधील दोन आणि उरलेले प्रत्येकी एक रुग्ण नवी मुंबई, सांगली, गोवा, अमरावती, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, ओडिसा, आसाम आणि तेलंगाना येथील आहे.

चीनमधील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता विमानतळावर आरटीपीसीएल चाचणी सुरू करण्यात आली आहे. पॉझिटिव्ह आढळलेले सगळे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात येत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या बघून, सर्वांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा केंद्र सरकारकडून देण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

[emoji_reactions]

Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या