Eknath Khadse | मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस नेते एकनाथ खडसे नॉच रिचेबल 

Eknath Khadse | जळगाव : अनेक घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झालेलं आहे. रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. अशातच आताच्या घडीला सर्वात महत्वाची बातमी समोर येतेय. राष्ट्रवादीचे नेते तथा विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) गेल्या आठ दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची माहिती समोर येत असून ते नेमके कुठे आहेत याबाबत आता कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला आहे.

एकीकडे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना व राज्यात विविध राजकीय घडामोडी घडत असताना अचानक एकनाथ खडसे हे नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळातही चर्चेला उधाण आले आहे. त्यांचा फोन लागत नसल्याची तक्रार सामान्य कार्यकर्ते करत आहेत.

जळगाव जिल्ह्यातील बडे प्रस्थ असलेले एकनाथ खडसे  सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे राजकारणी आहेत. मुक्ताई नगरातील ते आमदार असून त्यांनी महाराष्ट्राचं महसूल मंत्रीपदही भूषवलं आहे. 2020 मध्ये भारतीय जनता पार्टीतील मतभेद आणि अस्वस्थतेमुळे त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी भाजपा सोडली.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर या पक्षातही त्यांना फार मोठी संधी मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या पक्षातही ते नाराज असल्याची चर्चा आहे. एकनाथ खडसे हे मुंबईत असल्याचे सांगण्यात येत असून त्यांची तब्येत खराब असून आराम करत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या :