Anil Desai | “शिंदे गटाचे वकील उद्या स्वतःलाच पक्षप्रमुख म्हणून…”; अनिल देसाईंचा खोचक टोला 

Anil Desai | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं आणि भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन केलं. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जाऊ लागला. परिणामी नेमकी शिवसेना कुणाची?, या वादाला सुरुवात झाली. दरम्यान, शिवसेना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह कुणाचे? यावर थोड्याच वेळात निवडणूक आयोगाकडे सुनावणी होणार आहे.

अशातच ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी शिंदे गट आणि त्यांच्या वकिलांवर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले, “शिंदे गटाचे वकील हे मागच्यावेळी हास्यास्पद दावा करत होते. ज्या लोकांना पक्षातून बाद केलेले आहे. ते लोक पक्षावर दावा करत असतील तर हे हास्यास्पद आहे.”

“उद्या शिंदे गटाचे वकील मीच मुख्य नेता असल्याचे म्हणतील. पण त्यांच्या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. निवडणूक आयोग नियमांनुसार काम करते, ते योग्य निकाल घेतील”, असं म्हणत अनिल देसाई (Anil Desai) यांनी शिंदे गटाच्या वकिलांना टोला लगावला.

पुढे ते म्हणाले, “न्याय देणे निवडणूक आयोगाच्या हातात आहे, त्याच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. पण हे करत असताना सर्व बाजू पडताळून पाहणं, दस्ताऐवज पाहणं, काय खरं – काय खोटं तपासलं गेलं पाहीजे. निवडणूक आयोग याची छाननी करेल, अशी आम्हाला खात्री वाटते.”

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.