Sanjay Raut | संजय राऊतांना ‘ते’ वक्तव्य पडलं महागात; डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांकडून तीव्र शब्दात निषेध

Sanjay Raut | मुंबई : शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. अनेकदा विरोधकांवर टीका करताना राऊतांची जीभही घरल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळाली आहेत. संजय राऊत आपल्या बेधडक वक्तव्य केल्यामुळे संजय राऊत अनेकदा चर्चेत आले आगहेत. पुन्हा एकदा राऊतांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

“कोरोनाच्या काळात राज्यातील डॉक्टर्स आणि नर्स आपल्या जबाबदारीतून पळून गेले” असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यात तीव्र पडसाद उमल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्यातील समस्त डॉक्टर्स आणि त्यांच्या संघटनांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. ‘आयएमए’सह प्रमुख संघटनांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कल्याण आयएमएच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनातील ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून आपली भूमिका मांडली.

एकीकडे कोरोना काळात डॉक्टर्स आणि नर्स देवदूत ठरले. त्यांनी स्वत:चा जीव, कुटुंबाची पर्वा न करता अनेकांना जीवदान दिल्याचे अनेकांकडून बोलले गेले आहे. तर दुसरीकडे याच डॉक्टरांबाबत बोलताना संजय राऊतांनी असे वक्तव्य केल्यामुळे राज्यातील डॉक्टर्स आणि संघटना नाराज झाल्या आहेत.

“संजय राऊतांचं वक्तव्य फारच वेदनादायी होतं. पहिल्या लाटेत कल्याण डोंबिवलीतील खाजगी डॉक्टर्स आणि महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील डॉक्टर्स ठाकरे सरकारसोबत अगदी खांद्याला खांद्या लावून काम करत होते. त्यानंतर हे राऊतांचं वक्तव्य समोर आल्यानंतर आम्हाला मात्र खूप वेदना झाल्या आहेत. याचा रोश आम्ही कल्याणमधील ठाकरे गटाचे स्थानिक नेते विजय साळवी यांच्याकडे मांडला आणि ही बाब उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः फोन करत डॉक्टरांची समजूत काढली”, असे कल्याण आयएमए अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी सांगितले आहे.

“हे सर्व गैरसमजातून झाले आहे. आम्हाला डॉक्टर आणि नर्स यांच्याबद्दल नितांत आदर आहे. कोरोनावर मात मी मुख्यमंत्री असताना डॉक्टर आणि नर्स यांच्या साहाय्यानं करू शकलो, असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि आमची समजूत काढली. त्यानंतर या वादावर आता पडदा आहे” असेही प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या :