Aditya Thackeray | “झोपी गेलेला कुंभकर्ण जागा झाला”; आदित्य ठाकरे यांच्यावर मनसेच्या ‘या’ नेत्याची टीका 

Aditya Thackeray | मुंबई : मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. रस्ते घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलीय.  त्यांच्या त्या मागणीवरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फक्त आताच्या रस्ते घोटाळ्याची चौकशी न करता मागील काही वर्षे चाललेल्या घोटाळ्याचीही चौकशी करावी अशी मागणी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करताना झोपी गेलेला कुंभकर्ण जागा झाला असल्याचं म्हंटल आहे.

शालेय विद्यार्थ्यांना 4 हजार ते 5 हजार रुपयांना मिळणारे टॅब 12 हजार रुपयांचे टॅब विकत घेण्यात आले, आणि एक वर्षाच्या आत ते बंदही पडले त्यावरही त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी असा टोला त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

उद्धव ठाकरे यांचे मित्र चित्रकार रामनाथकर मुंबई महानगरपालिकेला मोफत लोगो करुन देणार होते. मात्र त्यांना लोगो तयार करून दिल्यानंतर महानगरपालिकेच्या स्थायी समितीकडे त्याचे 32 लाखाचे बिल आले. त्यावेळी मनसेने त्या बिलाबाबत आक्षेप नोंदवत तो घोटाळा उघडकीस आणला असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.