Ajit Pawar | “शुभांगी पाटील यांच्या पाठिंब्यावरून ‘मविआ’त मतभेद?”; अजित पवार म्हणाले, “भाजपच्या बोलण्याला…”

Ajit Pawar | मुंबई :  नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसच्या सत्यजीत तांबेंनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सत्यजीत तांबेंना भाजप पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीत नाशिक, नागपूर आणि अमरावतीच्या उमेदवारीवरून बराच गोंधळ झाल्याचं समोर आलं आहे. तर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला आहे. पण महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठिंबा आहे का?, यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली.

कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. ते म्हणाले, “अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे त्यामुळे यावर उद्या अंतिम निर्णय होईल.”

आघाडी म्हणून जागा वाटप करताना औरंगाबाद (विक्रम काळे) ही जागा राष्ट्रवादीकडे तर नाशिक कॉंग्रेसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली मात्र त्यांनी अर्ज भरला नाही. हा अर्ज न भरण्यामागे काय कारण आहे हे फक्त डॉ. सुधीर तांबेच सांगू शकतील असेही अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

हा कॉंग्रेस अंतर्गत प्रश्न आहे त्यात महाविकास आघाडीला गोवण्यात काही अर्थ नाही. तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून निर्णय घेतला होता त्याला मी साक्षीदार आहे असे सांगतानाच त्यामुळे महाविकास आघाडीत समन्वय नव्हता हे मी मान्य करणार नाही, असे अजित पवार म्हणाले. या जागा वाटपावर भाजप बोलत आहे. मात्र त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही बसून योग्य तो मार्ग काढला होता मात्र अर्ज न भरल्याने प्रश्न निर्माण झाला आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या :

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.