Vinayak Raut | “केसरकर सरड्यासारखा रंग बदलतात”; विनायक राऊतांची जहरी टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vinayak Raut | मुंबई : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबत एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे. ‘आगामी लोकसभा निवडणुकीत राणे उमेदवार असतील तर त्यांचा मी स्वतः प्रचार करेन. त्यांना निवडून आणणार’ असे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं आहे. ‘आपण नारायण राणेंचा आदराने उल्लेख करतो. माझे आणि भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यातील वैर संपलेले आहे’, असेही केसरकर म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केसरकरांवर सडकून टीका केली आहे.

“दीपक केसरकर हे दलबदलू आहेत. सरडा जसा रंग बदलतो तसं ते बदलतात. दीपक केसरकर हे डुख धरून वागतात. त्यामुळे केसरकर यांनी नारायण राणे यांच्या प्रचारात उतरूदेत किंवा आणखी कोणाचा प्रचार करू देत, आम्हाला अडचण नाही. त्यांनी त्यांच्या मतदारसंघात डिपॉझिट वाचवण्याचा प्रयत्न करावा,” असा टोला राऊत यांनी दीपक केसरकर यांना लगावला आहे.

दरम्यान, निलेश राणे यांच्यावर बोलण्याची आमची इच्छा नाही. अशा घाणेरड्या वृत्तीचा माणूस जगात निर्माण झालेला नाही. निलेश राणे म्हणजे विकृती. या विकृतीला आम्ही भीक घालत नाही,” असेही विनायक राऊत म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या