Vinayak Raut | “त्यांचा बोलविता धनी दुसराच”; निवडणूक चिन्हाबाबत बोलताना विनायक राऊतांची शिंदेंवर बोचरी टीका

Vinayak Raut | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटाने शिवसेना पक्ष तसेच धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर आपला हक्क सांगितला आहे. याबाबत आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडली. निवडणूक आयोगाने निवडणूक चिन्हाबाबत अद्याप निर्णय दिलेला नाही. याबाबत 20 तारखेला पुढील सुनावणी होणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात पुन्हा एकदा कलगितुरा रंगला आहे. ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी निवडणूक चिन्ह आणि पक्षाबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. “आम्ही धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर पुराव्यानिशी दावा करत आहोत. निवडणूक चिन्ह आम्हालाच मिळणार आहे. एकनाथ शिंदे यांचा बोलविता धनी दुसराच आहे. शोध घेतल्यावर ते समजेल. राजकीय दबावापोटी एकनाथ शिंदे बोलत आहेत”, असे विनायक राऊत म्हणाले आहेत.

“शिवसेनेतील फूट कपोकल्पित आहे. शिंदे गट हे वास्तव नाही. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनाच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट झालेली नाही. जे आमदार बाहेर पडले आहेत ते त्यांच्या इच्छेने बाहेर पडले आहेत. पक्षातून बाहेर पडले ते वेगळ्या गटाचे आहेत. शिंदे गट हा शिवसेना नाही. शिवसेना फुटीचा पक्षावर कोणताही परिणाम झालेला नाही. ही फूट ग्राह्य धरु नये. ती काल्पनिक असू शकते”, असे कपिल सिब्बल यांनी सुनावणी वेळी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षातून एखादा मोठा गट लोकप्रतिनिधींसह बाहेर पडला तर त्यात बेकायदेशीर काय? आमच्याकडे संख्याबळ जास्त संख्याबळ जास्त असल्याने चिन्हाचा लवकर निर्णय घ्यावा. आम्ही कागदपत्रे सादर केले आहेत. त्यामध्ये कोणत्याही त्रुटी नाहीत. ठाकरे गटाचे पदाधिकारी होते त्याचपद्धतीने शिंदे गटाचे पदाधिकारी नेमले गेले होते. त्यामध्ये कोणतीही चूक नाही. मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी बाहेर पडत आहेत, यामध्ये तथ्य आहे, असे सांगत शिंदे गटाचे वकील महेश जेठमालांनी यांचा युक्तिवाद  केला आहे.

महत्वाच्या बातम्या :