Share

Rakhi Sawant | राखी सावंतची आई रुग्णालयात दाखल, ‘या’ व्यक्तीने उचलला उपचाराचा खर्च

Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राखीच्या खाजगी आयुष्यात सध्या बऱ्याच समस्या उत्पन्न झाल्या आहेत. एकीकडे तिच्या लग्नावरून तणाव निर्माण झालेला असताना, दुसरीकडे तिच्या आईची प्रकृती खालावली आहे. राखी सावंतच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या आईला आधीच कॅन्सर झालेला होता. त्यानंतर … Read more

Published On: 

Rakhi Sawant | मुंबई: बॉलीवूडची ड्रामा क्वीन म्हणजेच राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राखीच्या खाजगी आयुष्यात सध्या बऱ्याच समस्या उत्पन्न झाल्या आहेत. एकीकडे तिच्या लग्नावरून तणाव निर्माण झालेला असताना, दुसरीकडे तिच्या आईची प्रकृती खालावली आहे. राखी सावंतच्या आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्या आईला आधीच कॅन्सर झालेला होता. त्यानंतर त्या ब्रेन ट्युमराच्या शिकार झाल्या. काही दिवसांपूर्वी राखीचा रुग्णालयातून रडतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ती तिच्या आईला बरं होण्यासाठी प्रार्थना करताना दिसली होती. बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) ने तिला आर्थिक मदत केली होती. तर, आता देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीने राखीच्या आईचा उपचाराचा खर्च उचलला आहे.

माध्यमांशी बोलताना राखी सावंतने सांगितलं आहे की, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती माझ्या आईच्या उपचाराचा खर्च उचलत आहे. ती म्हणाली, “माझी आई लोकांना ओळखू शकत नाहीये. तिला काहीच खाता-पिता येत नाहीये. मी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे मनापासून आभार मानते. कारण त्यांनी आईच्या उपचारासाठी मोठी मदत केली आहे. त्यांनी आईच्या उपचाराचा खर्च सुद्धा कमी करून दिला आहे.”

राखी सावंत बिग बॉसच्या घरात असताना तिच्या आईची प्रकृती खालावली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राखीचा व्हिडिओ समोर येताचं चाहत्यांनी तिच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली होती. राखीची आई कॅन्सर आणि ब्रेन ट्यूमरला झुंज देत होती. त्यांच्या या समस्यांचे निदान झाले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राखी सावंतच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. राखीने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबत लग्न केलं  आहे. त्या दोघांनी आधी कोर्टात लग्न केलं असून त्यानंतर निकाह केला आहे. लग्नानंतर मी इस्लाम कबूल केला असल्याचं राखीने सांगितलं आहे. तर लग्नानंतर आदिलने राखीचं नाव ‘फातिमा’ ठेवलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही