Weather Update | जम्मू-काश्मीरमध्ये गोठले नदी-नाले, तर लडाखमध्ये -29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये अनेक ठिकाणी थंडी (Cold) चा जोर वाढत आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, उत्तर भारतामध्ये बर्फवृष्टी चांगलीच वाढली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये तापमानाचा पारा मायनसमध्ये गेला आहे. तर लडाख (Ladakh) मध्ये मायनस 29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाखमधील अनेक ठिकाणी नदी नाले गोठले आहे. त्याचा परिणाम थेट जनसामान्यांच्या जीवनावर होत आहे. पाणी गोठल्यामुळे माणसांसह प्राण्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

लडाखमध्ये थंडीचा जोर वाढल्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी वाढल्यामुळे आकर्षक दृश्य पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे वाढत्या थंडीमुळे पाणी गोठल्यामुळे जनसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लडाखमध्ये मायनस 29.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आलं आहे. तर, कारगिलमध्ये मायनस 20.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

कारगिलसह लडाखमधील रस्त्यांवर बर्फाची चादर पसरलेली दिसत आहे. त्यामुळे वाहतुकीत मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण झाला आहे. वाढत्या थंडीमुळे पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन देखील गोठल्या आहे. त्यामुळे येथील नागरिकांना आता विहिरीतून पाणी भरावे लागत आहे. या वाढत्या थंडीमुळे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे.

उत्तर भारत आणि उत्तर पश्चिम भारतात थंडीचा जोर वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत हवामान खात्याकडून दिलासादायक माहिती समोर आली आहे. येत्या 19 जानेवारीपासून उत्तर भारत आणि पश्चिम भारतात थंडीची लाट कमी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनंतर जनसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या