Hair Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकालाच दाट, मजबूत आणि चमकदार केस हवे असतात. मात्र, खराब जीवनशैली आणि वाढत्या प्रदूषणामुळे केसांच्या संबंधित समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पद्धतींचा अवलंब करत असतात. अनेक जण केसांच्या समस्या सोडवण्यासाठी रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, रसायनिक उत्पादनामुळे केसांना हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची निगा राखण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही बदल करू शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये पुढील ज्यूसचा समावेश करू शकतात.
कोरफडीचा ज्यूस
कोरफडीच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. कारण यामध्ये विटामिन सी, विटामिन ई, बीटा केरोटीन यासारखी पोषक तत्वे मुबलक प्रमाणात आढळून येतात. कोरफडीच्या रसाचे नियमित सेवन केल्याने तुमचे केस मजबूत होऊन त्यांची चमक वाढण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर या रसाचे नियमित सेवन केल्याने तुमच्या शरीरामध्ये दिवसभर ऊर्जा राहते.
किवी ज्यूस
किवीचा ज्यूस प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. कारण यामध्ये माफक प्रमाणात विटामिन ई आणि इतर पोषक घटक आढळून येतात. हे पोषक घटक केसांना दाट आणि मजबूत बनवण्यास मदत करतात. त्याचबरोबर या रसाचे नियमित सेवनाने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊ शकते.
आवळा ज्यूस
आवळा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म आणि पोषक तत्वे गंभीर आजाराच्या समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. आवळ्याच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी तुम्ही नियमित आवळ्याच्या रसाचे सेवन करू शकतात.
टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Sushma Andhare | “भगव्या रंगाची साडी घालून आमच्या नवनीत अक्कानी…”; सुषमा अंधारेंची सडकून टीका
- Weather Update | जम्मू-काश्मीरमध्ये गोठले नदी-नाले, तर लडाखमध्ये -29.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद
- KL Rahul & Athiya Shetty | केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाची जोरदार तयारी, पाहा व्हायरल VIDEO
- Rakhi Sawant | राखी सावंतलची आई रुग्णालयात दाखल, ‘या’ व्यक्तीने उचलला उपचाराचा खर्च
- Weather Update | ‘या’ तारखेपासून होणार थंडीचा कडाका कमी, जाणून घ्या हवामान अंदाज