Alia Bhatt | आलिया भट्ट पुन्हा प्रेग्नेंट? सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट बघून चाहत्यांना बसला धक्का

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Alia Bhatt | मुंबई: बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांनी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लग्न गाठ बांधली होती. आलियाने लग्नाच्या दोन महिन्यानंतर म्हणजेच जूनमध्ये गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. नोव्हेंबर 2022 मध्ये आलिया आणि रणबीरला एक सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा कपूर असे ठेवले आहे. राहा कपूर 6 जानेवारी 2023 रोजी दोन महिन्यांची झाली आहे. मात्र, आतापर्यंत आलिया आणि रणबीरने त्यांच्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवलेला नाही. अशात आलियाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचे कॅप्शन बघून ती पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

आलियाने  इंस्टाग्रामवर नुसताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या हातामध्ये फुल दिसत आहे. आलिया या फुलांच्या माध्यमातून दोन आकडा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे, असा अंदाज बांधला जात आहे. तिने या फोटोला कॅप्शन दिले आहे, “2.0 स्टे ट्यून”.

आलियाच्या फोटोचे हे कॅप्शन बघून ती पुन्हा गरोदर आहे का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. चाहते  तिच्या या पोस्टवर वेगवेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स करत आहे. एक चाहता कमेंट करत म्हणाला, “दुसरं बाळ येणार आहे का?” तर अजून एक चाहता कमेंट करत म्हणाला, “ब्रह्मास्त्र 2.0”. आलिया नक्की कसला 2.0 घेऊन येणार आहे, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आलियाने राहाच्या जन्मानंतर पहिल्या मुलाखतीमध्ये मातृत्वाबद्दल भावना व्यक्त केली होती. ती म्हणाली होती, “मातृत्वाच्या भावनेने माझ्यामध्ये खूप काही बदल आणले आहे. पहिल्यापेक्षा आता माझं मन खूप मोकळं झाल आहे. अजून काय काय बदल होतील ते मला माहित नाही, ते पाहायला मला  नक्की आवडेल. या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे.”

महत्वाच्या बातम्या