IB Recruitment | युवकांनो लक्ष द्या! IB मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
.

IB Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: भारत सरकारमध्ये नोकरी शोधत असलेल्या युवकांसाठी सुवर्णसंधी! भारत सरकारच्या गृहमंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभाग (IB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुप्तचर विभागाच्या या रिक्त पदांसाठी पदांनुसार पात्रधारक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार http://www.mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

भारत सरकारच्या गुप्तचर विभागामध्ये सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये तब्बल 1675 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये सुरक्षा सहाय्यक/ कार्यकारी आणि मल्टी टास्किंग कर्मचारी इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

गुप्तचर विभाग यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरविण्यात आली आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय अधिनस्त असलेल्या गुप्तचर विभागाच्या या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवार 10 फेब्रुवारी 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या पदांबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.mha.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

महत्वाच्या बातम्या

 बातम्यांसाठी Follow आणि Subscribe करा
Google News Follow
YouTube Subscribe