Rishabh Pant | ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट, अजून ‘इतक्या’ दिवस राहवे लागणार हॉस्पिटलमध्ये

Rishabh Pant | मुंबई: भारतीय स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत (Rishabh Pant) याचा 30 डिसेंबर रोजी भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर त्याला डेहराडून येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आणि शस्त्रक्रियेसाठी त्याला मुंबईतील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. कोकिलाबेन रुग्णालयातून ऋषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची अपडेट आली आहे.

ऋषभ पंतच्या गुडघ्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. त्याच्या दोन लिगामेंट शस्त्रक्रिया झाल्या आहेत. त्याला झालेल्या बाकी लिगामेंट इंजरी आपोआप भरून येतील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. मात्र, त्याला अजून दोन आठवडे रुग्णालयात काढावे लागणार आहेत. पुढील दोन आठवड्यात ऋषभ पंतला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.

कोकिलाबेन रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ऋषभ पंतचा रिहॅब प्लॅन तयार केला जाणार आहे. पुढच्या दोन महिन्यांमध्ये त्याची रिहॅब प्रक्रिया सुरू होऊ शकते. लिगामेंट ठीक होण्यासाठी चार ते सहा आठवड्याचा कालावधी लागतो. त्यानंतरच ऋषभ पंतचे रिहॅब सुरू होईल. दोन महिन्यानंतर तो क्रिकेट खेळायला सुरुवात करू शकतो की नाही हे एकदा बघितले जाईल. यादरम्यान ऋषभ पंतला काउन्सिलिंग देखील देण्यात येईल, असे एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

भारतीय संघातील यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत याचा भीषण कार अपघात झाला होता. दिल्लीवरून रुडकी येथे जाताना ही दुर्घटना घडली होती. तो त्याच्या आईला भेटायला निघाला होता. अपघातानंतर त्याच्या कारने पेट घेतला होता. या भीषण अपघातामध्ये ऋषभ पंत  सुदैवाने बचावला आहे.

महत्वाच्या बातम्या