Car Safety Features | उत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससह बाजारामध्ये उपलब्ध आहेत ‘या’ कार

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Car Safety Features | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये दरवर्षी लाखो अपघात होतात. या अपघातामध्ये लाखो लोकांना आपले जीव गमवावे लागतात. या अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर हे अपघात टाळण्यासाठी कार उत्पादक कंपन्या आपल्या कारमध्ये अनेक सेफ्टी फीचर आणि एअर बॅग (Air Bag) उपलब्ध करून देत असतात. कारण कार खरेदी करत असताना लोक सुरक्षिततेला पहिले प्राधान्य देतात. म्हणूनच या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सुरक्षित कारबद्दल माहिती सांगणार आहोत. बाजारामध्ये पुढील कार उत्कृष्ट सुरक्षा फीचर्ससह उपलब्ध आहे.

Maruti Brezza

मारुतीची ही कार भारतीय बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त विकणारी कार आहे. या कारची किंमत 8.19 लाख ते 14.4 लाख रुपये आहे. मारुतीची ही एसयूव्ही 1.5L पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 103PS पॉवर आणि 137Nm टार्क जनरेट करते. त्याचबरोबर या कारमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देखील जोडलेले आहे. या कारमध्ये नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅडल शिफ्टर्स (एटी व्हेरिएंट), सिंगल-पेन सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले आणि 360-डिग्री कॅमेरा इत्यादी फीचर्स उपलब्ध आहे. तर यामध्ये सुरक्षिततेसाठी नऊ-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, पॅडल शिफ्टर्स (एटी व्हेरिएंट), सिंगल-पेन सनरूफ, अॅम्बियंट लाइटिंग, वायरलेस फोन चार्जिंग, हेड-अप डिस्प्ले आणि 360-डिग्री कॅमेरा उपलब्ध आहे.

Hyundai Aura

Hyundai Aura ही कार बाजारामध्ये चार प्रकारात उपलब्ध आहे. यामध्ये Hyundai Aura E, S, SX आणि SX(O) यांचा समावेश आहे. या कारची किंमत 7.24 लाख ते 10.14 लाख रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन उपलब्ध आहे. हे इंजिन 82bhp आणि 114Nm टार्क निर्माण करू शकते. या कारमध्ये ESC, VSM, HAC, TPMS, कर्टन एअरबॅग्ज आणि रियल डिफॉगर इत्यादी सुरक्षा वैशिष्ट्य उपलब्ध आहेत. त्याचबरोबर या कारमध्ये 15-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, बूट लिडवर एक क्रोम स्ट्रिप आणि रियल स्पॉयलर इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.

Mahindra XUV300

महिंद्राची Mahindra XUV300 ही कर बाजारामध्ये चार पर्यायांसह उपलब्ध आहे. यामध्ये W4, W6, W8 आणि W8(O) यांचा समावेश आहे. या गाडीची किंमत 8.41 लाख ते 14.7 लाख रुपये पर्यंत आहे. या कारमध्ये अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह सात-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सिंगल-पेन सनरूफ आणि क्रूझ कंट्रोल इत्यादी वैशिष्ट्य उपलब्ध आहेत. यामध्ये सात एअरबॅग, EBD सह ABS, ऑल-व्हील डिस्क ब्रेक, कॉर्नर ब्रेकिंग कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर आणि फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर इत्यादी सुरक्षा फीचर्स उपलब्ध आहे.

महत्वाच्या बातम्या