World Cancer Day | दरवर्षी जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या सविस्तर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

World Cancer Day | टीम महाराष्ट्र देशा: दरवर्षी जगभरात 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोकांमध्ये कर्करोगाबाबत जनजागृती निर्माण केली जाते. एका रिपोर्टनुसार, जगामध्ये दरवर्षी सुमारे दहा लक्ष लोकांना कर्करोगामुळे मृत्यूला सामोरे जावे लागते. योग्य उपचार, जीवनशैलीमध्ये आवश्यक बदल, नियमित तपासणी याद्वारे या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते. कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्याच्या प्रतिबंधास प्रोत्साहन देण्यासाठी 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो.

कॅन्सर या शब्दाच्या उत्पत्तीचे श्रेय ग्रीक चिकित्सक हिप्पोक्रेटीक यांना दिले जाते. त्यांना वैद्यशास्त्राचे जनक म्हटले जाते. 2008 मध्ये सर्वप्रथम जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा करण्यात आला होता. या रोगाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि त्यावरील उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघाने याची स्थापना केली होती.

हा दिवस साजरा करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे जगभरात कर्करोगाबाबत जनजागृती करणे होय. कर्करोगाचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि लोकांना सतर्क राहण्यास प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) दरवर्षी एका ‘थीम’च्या माध्यमातून साजरा केला जातो. यावर्षी देखील हा दिन एका थीमच्या माध्यमातून साजरा केला जाणार आहे. यावर्षी जागतिक कर्करोग दिन ‘क्लोज द केअर गॅप’ या थीमच्या माध्यमातून साजरा केला जात आहे.

महत्वाच्या बातम्या