Share

Nana Patole | “अजितदादांचं ‘ते’ वक्तव्य ‘TRP’साठी”; नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया 

🕒 1 min read Nana Patole | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला. सत्यजित तांबे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nana Patole | मुंबई : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळालं. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

सत्यजित तांबे हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच अजित पवार यांनी हे वक्तव्य केल्यानंतर नाना पटोले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसच्या घरात काय चाललंय, याची अजित पवारांना कल्पना नाही. हे जाणून न घेताच अशा प्रकारची वक्तव्य करणं म्हणजे टीआरपी मिळवण्यासाठीच असावीत”, अशी टीका नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, “सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केली, अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी केलं आहे. अजित पवार ही एक जबाबदार व्यक्ती आहे. ते अशा पद्धतीने बोलत असतील तर या सगळ्या गोष्टीची चिंता आमच्याही मनात आहे. महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर याबाबत आम्ही खुलासा करू.”

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मदत केली. नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसने सत्यजित तांबे यांना तिकिट द्यायला हवं होतं. सत्यजित तांबेंना तिकिट द्या, हे सांगण्यासाठी शरद पवार यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Kharge) यांनाही फोन केला होता. मात्र डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आणि तिथंच गडबड झाली, असं अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

[emoji_reactions]

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या